आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगणा म्हणाली, 'मी अध्ययनला ओळखत नाही'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'राज 2' सिनेमात अध्ययन सुमन आणि कंगना रणावतने काम केले होते. त्या वेळी दोघे खूप जवळ आले होते. मात्र, बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडणार्‍या कंगनाने अध्ययनलादेखील सोडले. तिला नात्यात कोणतेही कमिटमेंट नको होते, त्यामुळे ती त्याच्यापासून दूर झाली. त्यानंतर तिचे नाव आदित्य पांचोली ते अजय देवगणसोबतही जोडले गेले. पांचोलीवर तर तिने छळ करण्याचा आरोपदेखील लावला होता. फक्त सलमानसोबत तिच्या जवळीकतेच्या बातम्या पसरल्या नाहीत. मात्र, दुबईमध्ये ती सलमानला गुपचूप भेटत असल्याची चर्चा होती.
आता अलीकडेच अध्ययन सुमनने तिच्यासोबत प्रेम असल्याची आणि आजही तिला विसरलो नसल्याचे म्हटले होते. मात्र, कंगनाने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. याविषयी तिला विचारल्यावर तिने अध्ययनला ओळख दिली नाही. ती म्हणाली की, अध्ययन कोण आहे? मी त्याला ओळखत नाही. शिवाय कोणाच्याही प्रेमाला मी गांर्भीयाने घेतले नसल्याचे ती म्हणाली. कंगना सुरुवातीपासूनच अशी आहे. सिनेमात काम करण्यासाठी ती घरातून पळून आली होती. 'गँगस्टर' रिलीजच्या वेळी तिच्या घरच्यांनी तर तिला आडनाव काढण्याचेदेखील म्हटले होते. अनेक वर्षे घरच्यांशी तिचे बोलणे बंद होते. तिच्या आजोबाला तिचे सिनेमात काम करणे आवडत नाही. तिचा आगामी सिनेमा 'क्वीन' लग्नात विश्वासघात झालेल्या मुलीच्या कथेवर आधारित आहे.