आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रज्जो'च्या स्क्रिनिंगला एकटीच पोहोचली कंगना, बॉलिवूड सेलिब्रिटींनी मारली दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत 13 नोव्हेंबरच्या रात्री अभिनेत्री कंगना राणावतच्या 'रज्जो' सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सिनेमात शीर्षक भूमिका साकारणारी कंगना राणावत पोहोचली होती. बॉलिवूडमधील इतर मंडळींनी मात्र या स्क्रिनिंगला दांडी मारली होती.
आता आपला सिनेमा बघायला कंगनानेच कुणाला आमंत्रित केले नव्हते, की बॉलिवूड सेलिब्रिटी इतर कुठल्या कारणामुळे येथे दिसले नाही, हे तर कंगनालाच ठाऊक. असो, यावेळी कंगनाचा नेहमीप्रमाणे हॉट लूक कॅमे-यात कैद झाला.
विश्वास पाटील दिग्दर्शित हा सिनेमा आज (15 नोव्हेंबर) रिलीज झाला असून कंगनाने डान्सरची भूमिकात साकारली आहे.
बघा स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...