आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangna Ranaut Attends London Autumn Winter Fashion Week

कंगनाला मिळाले लंडन फॅशन वीकचे आमंत्रण..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्या केंसिंगटन गार्डन्समध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या ऑटम विंटर फॅशन वीक 2014मध्ये अभिनेत्री कंगना राणावतला आमंत्रित करण्यात आले होते. कंगना येथे भारताचे प्रतिनिधित्व करत होती. तिने येथे ब्रिटिश लग्झरी ब्रॅण्ड बरबेरचा वीमंसवियर परिधान केला होता. या ब्रॅण्डचे कलेक्शन या फॅशन शोमध्ये सादर करण्यात आले होते.
कंगनाने यावेळी रेड कार्पेटवर पाउडर ब्लू इंग्लिश फ्लोरल लेसचा पेंसिल स्कर्ट, पांढरे जॅकेट आणि ट्रासल्यूसेंट विनिल सँडल्स घातले होते.
रेड कार्पेटवर तिच्यासोबतच हॉलिवूड स्टार ब्रॅडला कूपर, प्रसिद्ध रॉक बँड 'वन डायरेक्शन'चे हॅरी स्टाइल्स, फॅलिसिटी जोन्स आणि नाओमी हॅरिस हे इंटरनॅशनल सेलेब्स दिसले होते.