आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी अशी दिसत होती कंगणाना, PICSमध्ये बघा तिचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (6 मार्च) कंगणा राणावतच्या 'रिवॉल्वर राणी' सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. हा सिनेमा एप्रिलमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरनुसार कंगणा सिनेमात एका दबंग गर्लच्या भूमिकेत आहे. ती राजकारणात सक्रिय असते. सोबतच तिला बंदुकचा छंद आहे. तिच्या पात्राचे नाव अलका गुज्जर आहे.
सिनेमात कंगणाचा एक डायलॉग आहे, 'हम है अलका सिंह...आय लव्ह फॅशन, फन और गन'. याव्यतिरिक्त ती म्हणते, 'हमारे कपडे इटली से आते है'. यावरून स्पष्ट आहे, की ती या सिनेमात खूपच फॅशनेबल दबंग गर्लच्या रुपात दिसणार आहे.
ट्रेलरमध्ये तिने एक काळ्या रंगाचा चश्मा घातलेला असून तो तिच्या फॅशनेबल अंदाजाला खूप शोभून दिसतो. तसे पाहता, यापूर्वीही ती काळ्या रंगाचा चश्मा घातलेल्या अंदाजात दिसली आहे.
इंटरनेटवर तिच्या बालपणीचे एक छायाचित्र उपलब्ध आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाचा चश्मा लावलेला तिचा अंदाज 'रिवॉल्वर राणी'च्या अंदाजासारखाच आहे. या छायाचित्रामधून आणखी एक गोष्ट समजते, की कंगणाला काळ्या रंगाचा चश्मा बालपणापासून आवडतो.
कंगणाचा 'रिवॉल्वर राणी' अवतार लोकांना किती पसंतीस पडतो हे आता एप्रिलमध्येच कळेल. परंतु आम्ही आज तुम्हाला कंगणाचा बालपणीचे आणि काही जूने फोटो दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कंगणाचा बालपणीचा अंदाज...