आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाचा हीरो बनण्यासाठी 17 वर्षाच्या या तरुणाची बोर्डाच्या परीक्षेला दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


विश्वास पाटील दिग्दर्शित 'रज्जो' या सिनेमात अभिनेत्री कंगना राणावतने कोठेवालीची भूमिका साकारली आहे. या सिनेमाविषयीचे एक रहस्य उघड झाले आहे.

या सिनेमात कंगनाचा हीरो कोण याविषयी बराच सस्पेन्स बाळगण्यात आला होता. त्याचे नाव दिग्दर्शकाने गुलदस्त्यात ठेवले होते. मात्र आता त्यावरुन पडदा उचलण्यात आला आहे. या सिनेमातील कंगनाचा हीरो केवळ 17 वर्षांचा असून त्याचे नाव पारस अरोरा आहे. पारस मुळचा बरेलीचा असून यापूर्वी तो छोट्या पडद्यावर झळकला होता. 'वीर शिवाजी' या ऐतिहासिक मालिकेत पारसने शीर्षक भूमिका साकारली होती.

या सिनेमाची ऑफर आली तेव्हा पारस आपल्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होता. मात्र ही हातात आलेली संधी जाऊन नये, यासाठी पारसने मार्च महिन्यात बोर्डाची परीक्षा न देण्याचे ठरवले आणि ऑक्टोबरमध्ये परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

सिनेमाचे दिग्दर्शक विश्वास पाटील आणि डी.ओ.पी बिनोद प्रधान रज्जो सिनेमासाठी 17 वर्षीय तरुणाच्या शोधात होतो. मात्र बरेच प्रयत्न करुनदेखील त्यांना हवा तसा चेहरा मिळत नव्हता. यासाठी विश्वास पाटील यांनी बरेच ऑडीशन्स घेतले होते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...