आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'क्रिश 3'साठी कंगनाने घातला रबराचा टाईट सूट, कमी केले 4 किलो वजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'क्रिश 3' या सिनेमाचा पहिला प्रोमो अलीकडेच रिलीज करण्यात आला. या सिनेमातील ऋतिक रोशन आणि विवेक ओबरॉयबरोबर चर्चा होतेय ती कंगना राणावतची. प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या आगामी बहुचर्चित ‘क्रिश-3’ चित्रपटात अभिनेत्री कंगना राणावत सुपरवुमच्या भूमिकेत दिसणार आहे.

हॉलीवूडमध्ये आजवर अनेक सुपरवुमन प्रेक्षकांना पाहण्यास मिळाल्या. मात्र, बॉलीवूडमध्ये सुपरवुमन तशा अभावानेच दिसून आल्या. आता या सिनेमात कंगना सुपरवूमनच्या भूमिकेत झळकणार आहे.

या सिनेमातील कंगनाच्या लूक आणि कॉश्च्युमने प्रेक्षकांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित केले आहे. याचे श्रेय कंगनाला जाते. कारण या प्रोजेक्टसाठी कंगनाने बरीच मेहनत घेतली आहे.

कंगना सुपरवुमन दिसावी यासाठी लेटेक्स रबराने एक खास सूट तयार करण्यात आला. डिझायनर गेविन मिगुएलने यासाठी जवळ-जवळ 25 डिझाइन तयार केले होते. त्यानंतर एक डिझाइन फायनल करण्यात आले. हा सूट तयार करण्यासाठी 45 दिवस लागले. सूट घालण्यासाठी दोन तास लागत आणि शरीराला संपूर्ण चिकटणारा हा ड्रेस खूप गरम असतो, परंतु तरीही कंगनाने हा सूट घालून अनेक साहसदृश्ये दिली आहेत.

कंगनाच्या लूकविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...