आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangna Ranaut's Dress Too Short To Cover Her Legs At An Event

शॉर्ट ड्रेसमधून कंगनाने केले जोरदार एक्सपोज, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना राणावतच्या चाहत्यांना आता तिचा फिटनेस आणि डाएट मंत्रा जाणून घेता येणार आहे. शिवाय तिच्याविषयीच्या ब-याच गोष्टीही ते जाणू शकतील. ही सर्व माहिती त्यांना मिळणार आहे कंगनाच्या वेबसाईटवर.
अलीकडेच कंगनाने स्वतःची वेबसाईट लाँच केली. तसे पाहता कंगना सोशल नेटवर्किंग साईट्वर फार कमी दिसते. मात्र वेबसाईटच्या माध्यमातून तिने आता आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

तिच्या मते, फेसबूक किंवा ट्विटरवर स्टेटस अपलोड करणे ब-याच लोकांना पसंत नसतं. त्यामुळे तिने चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी वेबसाईटची मदत घेतली आहे.

या वेबसाईटवर कंगना प्रत्येक दिवशी आपल्या सिनेमा आणि शूटसंबंधीची माहिती चाहत्यांना देणार आहे. याशिवाय फिटनेस आणि डाएट टिप्सही ती देणार आहे. कंगनाला फोटोग्राफीची विशेष आवड आहे. त्यामुळे या वेबसाईटवर तिने क्लिक केलेली छायाचित्रेसुद्धा चाहत्यांना बघता येणार आहे.

या वेबसाईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कंगनाने यामध्ये एक खास ऑप्शन ठेवले आहे. त्यामध्ये चाहत्यांना प्रश्नांना ती उत्तर देणार आहे. मीडियासाठीही कंगनाने एक ऑप्शन ठेवला आहे. यामध्ये कॉपीराईटशिवाय तिचे वेबसाईटवरचे कोणतेही छायाचित्र मीडिया आर्टिकल्समध्ये वापरता येणार आहेत.

या इवेंटमध्ये कंगनाच्या वेबसाईट जितकी चर्चा झाली तितकीच तिच्या बोल्ड लूकचीसुद्धा झाली. कंगना या इवेंटमध्ये सुपर शॉर्ट व्हाईट ड्रेस परिधान करुन आली होती. या तोकड्या ड्रेसमधून तिचे पाय एक्सपोज झाले. याशिवाय तिच्या चेह-यावर पिंपल आणि मानेवर लाल डागही दिसले.

बघा वेबसाईट लाँचला पोहोचलेल्या कंगनाची ही खास छायाचित्रे...