आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाचा मुजरा, पाहा FIRST LOOK

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांत पडद्याआड गेलेला मुजरा पुन्हा एकदा सिनेमांमध्ये परत आला आहे. यावेळी अभिनेत्री कंगना राणावत मोठ्या पडद्यावर मुजरा करताना दिसणार आहे.

विश्वास पाटील यांच्या आगामी सिनेमातील 'कलेजा है हाजिर... खंजर कहां है...' या गाण्यावर ती मुजरा करताना दिसणार आहे. कंगनाने तीन वर्षे कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे.

कंगनाचा हा मुजरा गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केला आहे. कंगनाच्या या डान्सविषयी गणेश आचार्य यांनी सांगितले की, ''कंगनाचा डेडिकेशन पाहून मी दंग झालो. कंगनाचा हा पावर हाउस परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो. ती तुम्ही एका वेगळ्याच रुपात या गाण्यात बघणार आहात.''

दिग्दर्शक विश्वास पाटील यांनी सांगितले की, ''हे गाणे आम्हाला वैजयंतीमाला, वहीदा रहमान, मधुबाला यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यासारखे चित्रीत करायचे होते. त्यासाठी कथ्थक डान्स येणा-या अभिनेत्रीच्या शोधात आम्ही होतो. कंगना या गाण्यासाठी एकमद परफेक्ट वाटली. तिचा परफॉर्मन्स उत्तम झाला आहे.''
हे गाणे उत्तम सिंग यांनी लिहिले आहे.