आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan Johar And Ekata Kapur Made For Each Other?

करण आणि एकता: एक दुजे के लिए

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकता कपूर आणि करण जोहर मिळून एक चित्रपट बनवत आहेत. दोघेही चित्रपट पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आले आहेत आणि अतिशय यशस्वीदेखील आहेत. हा योगायोग आहे की दोघेही अविवाहितसुद्धा आहेत आणि दोघेही चाळीसच्या जवळपास आहेत. दोघेही आपापल्या कंपनीसाठी चित्रपट बनवण्यात सर्मथ आहेत. मात्र दोघांनी मिळून चित्रपट बनवण्याचा विचार केला आहे. मोठय़ा बजेटचा चित्रपट असल्याने दोघेही एकत्र आलेत, असेही म्हणता येणार नाही. आपण संधी दिलेल्या कलाकारांच्या करिअरसाठी करण इतर निर्मात्यांसोबत चित्रपट बनवायला तयार झाला आहे.

एकता कपूर नेहमी कमी बजेटचे चित्रपट बनवत असते. तथापि, आपल्या मालिकांसाठी भव्य सेट तयार करत असते. त्यांच्या मनात भव्यतेचा आग्रह तितकाच प्रबळ आहे जितका करण जोहर विषयी आहे. दोघांना अभिनयाचे वेड आहे. एकमेकांसोबत चित्रपट बनवत असताना अभिनय क्षेत्रात येण्याचे त्यांना बळ मिळो. या वयात अतिथी भूमिकेने काम चालू शकते.

दोघांच्या वैयक्तिक आवडी-निवडीवर त्यांची यशासाठीची महत्त्वाकांक्षा आहे. एकता कपूरला जितेंद्रने खूप लाडाने मोठे केले आहे. किशोरवयात ती खूप लठ्ठ होती. यश मिळवण्याच्या इच्छेने तिने आपल्या वडिलांकडून फक्त दोन लाख रुपये घेऊन मालिका बनवणे सुरू केले. त्यांच्या बंगल्याच्या गॅरेजमध्ये तिचे ऑफिस होते. आज तिने एक भव्य साम्राज्य उभे केले आहे. या यशासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. करण जोहरदेखील किशोरवयात खूप जाड झाला होता. आपले वडील चित्रपट निर्माते असल्याचे तो शाळेत कोणालाच सांगत नव्हता. दक्षिण मुंबईतील र्शेष्ठी समाजातील र्शीमंताच्या मुलांसोबत त्याने शिक्षण पूर्ण केले. त्या मुलांप्रमाणे चित्रपटाविषयी त्याच्या मनातसुद्धा तिरस्कार होता. मात्र आपल्या वडिलांसोबत एकदा आदित्य चोप्राला भेटल्यानंतर त्याचा दृष्टिकोन आणि आयुष्य बदलले.

तो आदित्य चोप्राचा सहायक दिग्दर्शक झाला आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या निर्मितीवेळी शाहरुख खानची त्याच्याशी जवळीक वाढली. काजोलदेखील दक्षिण मुंबईत लहानाची मोठी झाली आहे. ती करण जोहरला आधी भेटलेली होती. आदित्य चोप्रा, शाहरुख खान आणि काजोलच्या मदतीने करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ बनवला आणि त्याच्या वडिलांच्या आयुष्यभराची तपस्या यशस्वी झाली. ‘दोस्ताना’नंतर बनवण्यात आलेले त्यांचे सर्व चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यांनी प्रत्येक काळात मित्र बनवले आणि नात्यांना जपले.

करण जोहर आणि एकताची आवड आणि कलाबोधमध्ये मोठे अंतर आहे. मात्र यशासाठी समान आग्रह आहे आणि या सेतूवर दोघे भेटत आहेत. एकता महिला असूनही पुरुषासारखे धाडस ठेवते आणि करण पुरुष असूनही नारी सुलभ भावनांना महत्त्व देतो. कदाचित हाच विरोध त्यांना एकमेकांच्या जवळ घेऊन आला आहे. विरुद्ध ध्रुवांमध्ये आकर्षण प्रबळ असते. माध्यमात नेहमी दिसण्याची इच्छा दोघांत समान आहे. करण एकताप्रमाणे धार्मिक नाही. मात्र त्याच्या कंपनीचे नाव धर्मा प्रॉडक्शन आहे. अनेक देशांमध्ये एकाधिक निर्मिती कंपन्या मिळून चित्रपट बनवत असतात. त्यामुळे आर्थिक जोखीम कमी होते. भारतात आता हा काळ सुरू झाला आहे. करण जोहर चेतन भगतचा ‘टू स्टेट्स’ साजीद नाडियादवालासोबत मिळून बनवत आहे.

अनुराग कश्यपसोबतसुद्धा योजना बनवत आहे. एकता कपूरनेदेखील विशाल भारद्वाजसोबत ‘एक थी डायन’ बनवला आहे. एकता कपूरच्या प्रचाराची वेगळी शैली आहे. करण जोहरसुद्धा प्रचाराचे महत्त्व समजतो. एकता कौटुंबिक मालिका बनवण्यात तरबेज आहे. करण जोहरचे सुरुवातीचे चित्रपटदेखील थोडे कौटुंबिक होते. दोघेही आपल्या चित्रपटात अंगप्रदर्शन करवून घेतात. एकता महिला अंग प्रदर्शनावर विश्वास ठेवते तर करण जोहरच्या चित्रपटात पुरुष विनाकारणच अंगप्रदर्शन करत असतात. दोघेही आपापल्या दृष्टिकोनातून सौंदर्य सादर करत असतात. मात्र अशात हे असे मतभेद नाहीत ज्यामुळे दोघांनी सहकार्य करणे थांबवावे लागेल. खरं तर दोघांच्या महत्त्वाकांक्षा आणि यशासाठी वेड समान असल्यामुळे सहकार्याच्या चादरीवर मतभेदाच्या आढय़ा मिटवल्या जाऊ शकतात. मजेदार बाब म्हणजे दोघे एका जोडीच्या रूपात ‘मेड फॉर इच अदर’ वाटतात.