आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan Johar To Get Police Security On Jhalak Dikhla Jaa Sets

'झलक...'च्या सेटवर पोलिसांचा पहारा, धमकीच्या फोनमुळे घाबरला करण जोहर !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या खूप काळजीत पडला आहे. त्याच्या या काळजीचे कारण म्हणजे त्याला येत असलेले धमकीचे फोन.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करणला अज्ञात व्यक्तींकडून एका फोन नंबरवरून ‘एसएमएस’ पाठवून धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. करण जोहरनं याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केलीय. त्यानंतर पोलिसांनी करण जोहरच्या सुरक्षेत वाढ केलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खार पोलीस स्टेशनमध्ये करण जोहरनं याबद्दल तक्रार नोंदवलीय. एसएमएसमार्फत करणकडे पैशांची मागणी केली गेलीय. पैसे मिळाले नाहीत तर त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहा अशीदेखील यामध्ये धमकी दिली गेलीय.

सध्या करण जोहर 'झलक दिखला जा' या डान्स रिअँलिटी शोचा परीक्षक म्हणून काम बघत आहे. करण जोहरने या शोच्या सेटवरसुद्धा पोलिस प्रोटेक्शन मागितले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या करणला कुणाकडून धमकीचे फोन येत आहेत. यासोबत बघा झलकच्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्सची खास झलक...