आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहे 'गिप्पी'? भेटा वयाच्या 13व्या वर्षी नशीबाने रुपेरी पडद्यावर येणा-या रियाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


येत्या 10 मे रोजी सैफ अली खानच्या 'गो गोवा गॉन' या सिनेमाला टक्कर देण्यासाठी 'गिप्पी' बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या सिनेमात 'गिप्पी' ही शीर्षक भूमिका साकारणारी रिया विज मुळची दिल्लीची आहे. वयाच्या 13 व्या वर्षी पहिल्यांदाच कॅमे-यासमोर आलेली रिया आपल्या पहिल्या सिनेमामुळे खूप आनंदात आहे. या आनंदात रियाने अनेक गोष्टींवरुन पडदा उचलला. उदाहरणार्थ रिया बालपणापासून अमिताभ बच्चन आणि करीना कपूरची मोठी चाहती आहे. सध्या रिया रणबीर कपूरच्या प्रेमात पडली आहे. रणबीरची एक झलक बघून ती वेडी होते. आपल्या मोबाईलमध्ये नेहमी रणबीरचा फोटो ठेवणा-या रियाला सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रणबीरबरोबर काम करायचे आहे, हे कळल्यानंतर यावर तिचा विश्वासच बसला नाही.
'गिप्पी' हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. या सिनेमातील संवादांवर बाल आयोगने चिंता व्यक्त केली आहे. 'मेरे तो छोटे-छोटे समोसे जैसे है...' हा संवाद लहान मुलांच्या नेहमीच्या वाक्यप्रचारात सामील होण्याची भीती आयोगाने व्यक्त केली आहे. त्यामुळे हा संवाद प्रोमोतून काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे.
जाणून घ्या रिया आणि 'गिप्पी'विषयीच्या खास गोष्टी...