आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Doesn't Want Children From Saif Ali Khan

सैफच्या बाळाची आई होण्यास मॉर्डन करीनाचा नकार ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गेल्या वर्षी थाटात नवाब सैफ अली खानची बेगम झालेल्या करीनाला बाळ नकोय. करीना बाळाला जन्मच देऊ इच्छित नाहीये. एका फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत करिनानं या गोष्टीचा खुलासा केलाय. कदाचित सैफ अली खान आणि करीनाचं एकही अपत्य होणार नाही, असे तीने बिनदिक्कतपणे सांगितलंय.

करीना म्हणाली की. ‘या अगोदर एक वेळ अशी होती की भेटणारा प्रत्येक जण विचारायचा की, तू लग्न कधी करणार आहेस ? आता लग्नानंतर प्रत्येक जण विचारतोय की तू मुलाचा विचार कधी करणार? कुणाला माहित... मी कदाचित एकही मूल होऊ न देण्याचा निर्णयही घेऊ शकते. मी आता तर फक्त 32 वर्षांची आहे आणि सैफला तर अगोदरपासूनच दोन मुलं आहेत. आम्ही काही सर्वसाधारण नवरा-बायकोसारखे नाहीत जे फक्त मुलं हवीत म्हणून लग्नाच्या बंधनात अडकतात... आम्ही आधुनिक आहोत, आमचे विचार वेगळे असू शकतात’.

आता बेगम करीनाच्या या निर्णयाचे पटौडी कुटुंबीय स्वागत करणार की त्यांच्यासाठीही हा एक मोठा धक्का असणार हे तर येणा-या काळात स्पष्ट होईल.