आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Injured On The Sets Of 'Gori Tere Pyaar Mein'

स्टंट करताना करीना झाली जखमी, खुशाली विचारायला पोहोचले सेलेब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूर पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित ‘गोरी तेरे प्यार में’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली आहे. प्रकाश झांच्या 'सत्याग्रह' सिनेमाचे शुटिंग पूर्ण केल्यानंतर आता करीनाने 'गोरी तेरे प्यार में' या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली. या सिनेमातील एका दृश्याचे शुटिंग करताना करीना जखमी झाली. झालं असं की, या सिनेमाच्या शूटींगदरम्यान एका दृश्यात करीनाला कोणत्याही आधाराविना एका ‘रोप’वरून (दोरीवरून) चालायचं होतं. प्रोडक्शनबरोबर झालेल्या करारानुसार, तिला या स्टंटसाठी एखाद्या व्यक्तीची आवश्यकता असेल तर ती पुरवण्यास प्रोडक्शननं तयारी दर्शवली होती. मात्र, करीनाने हा स्टंट स्वत:च करण्याचा निर्णय घेतला.

हे दृश्यं शुट करताना ती पूर्ण काळजी घेत होती, परंतू जाडसर दोरीवरुन चालताना तिचा तोल ढासळला आणि ती जखमी झाली. तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. आपली भूमिका जिवंत वाटावी यासाठी करीनाने हा सगळा अट्टाहास केला. मात्र घडले काही तरी वेगळेच.

करीना सेटवर जखमी झाली हे कळताच तिचे शुभचिंतक तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले. करीनाच्या शुभचिंतकांमध्ये अर्जुन कपूर, संजय कपूर, अमृता अरोरा, सोनम कपूर, करिश्मा कपूर यांचा समावेश आहे.

करीनाची खुशाली जाणून घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...