आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा बेगम झाल्यानंतर कसा बदलला बेबोचा नवाबी थाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूर एक अशी भारतीय अभिनेत्री आहे जिने बॉलिवूडमध्ये एका मेगास्टार कलाकाराच्या मुलासोबत पदार्पण केले. करीनाने अभिषेक बच्चनसोबत 2000 साली 'रिफ्यूजी' चित्रपटातून चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर करीनाने आतापर्यंत विविध चित्रपटात उल्लेखनीय काम केले आहे.

करीनाचे 'जब वी मेट', 'चमेली', 'हीरोइन', '3 इडियट्स', 'अशोका', 'कभी खुशी कभी गम' आणि 'ओमकारा' हे आणि इतरही चित्रपट हिट झाले. नुकताच 'पीपल्स मॅग्झीन'ने करीनाला भारतातील सर्वात सुंदर महिलेचा किताब दिला आहे.

जेव्हा करीनाने सैफअली खानसोबत लग्न केले तेव्हापासून ही ललना रॉयल रंग-रुपात बदलली आहे. आता करीना एका चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये घेते.