आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफबरोबर बर्थडे सेलिब्रेट केल्यानंतर खुलला बेबोचा चेहरा, विदाऊट मेकअपसुद्धा दिसली सुंदर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सोमवारी लंडनहून मुंबईला परत आली. करीना सैफ अली खानबरोबर आपला 33 वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला गेली होती.
21 सप्टेंबर रोजी बेबोचा वाढदिवस होता. सैफ लंडनमध्ये त्याच्या आगामी 'हमशक्ल' या सिनेमाचे शूटिंग करत होता. त्यामुळे त्याने करीना तेथेच बोलावून घेतले होते. सैफने बेबोच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी खास तयारी केली होती.
सिनेमाच्या सेटवर सैफ आणि त्याच्या क्रू मेंबर्सनी करीनासाठी सरप्राईज पार्टी आयोजित केली होती. वाढदिवस साजरा करुन करीना मुंबईत परतली आणि सैफ लंडनमध्ये आपल्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
करीना सोमवारी मुंबई विमानतळावर ब्लॅक टाईट्स, ब्लू ब्लेजर आणि स्पोर्ट्स शूजमध्ये अगदी कूल दिसली. यावेळी करीना विदाऊट मेकअपसुद्धा सुंदर दिसली. सैफबरोबर चांगला वेळ घालवल्यामुळे करीना खूप रिलॅक्स दिसली.
बघा मुंबई विमानतळावर क्लिक झालेली करीनाची खास छायाचित्रे...