आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफबरोबर लग्न केल्यानंतर बेगम करीना झाली मांसाहारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री करीना कपूर शुद्ध शाकाहारी लोकांच्या यादीत होती. मात्र सैफ अली खानबरोबर लग्न केल्यानंतर करीनाची टेस्ट बदलली आहे. याचा खुलासा खुद्द करीनाच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी केला आहे. एका मुलाखतीत शर्मिला यांनी सांगितले की, माझी सून शाकाहारी असल्यामुळे मी तिच्यासाठी खास डीश बनवू शकत नव्हते. मात्र आता बेबोने मासे खायला सुरुवात केली आहे. मी तिच्यासाठी खास बंगाली पद्धतीची फिश करी बनवते.
विशेष म्हणजे शाहीद कपूरबरोबर अफेअर सुरु असताना करीना शाकाहारी झाली होती. यावर तिचे वडील रणधीर कपूर यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आता सैफची बेगम झाल्यानंतर तिने पुन्हा मांसाहार सुरु केला आहे.