रोहित शेट्टी त्याच्या पहिल्या टीव्ही शो 'खतरो के खिलाडी-5'च्या शूटींगसाठी अर्जेटीनाला जाणार आहे. अशामध्ये 'सिंघम 2'ची शूटींग पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. करीना कपूरने सांगितलं, की अजय देवगनसोबत तिच्या या सिनेमाची शूटींग लवकरच चालू होणार आहे. तिने सांगितलं 'मी सिंघम-2ची शूटींग फेब्रुवारीपासून सुरू करणार आहे.' तिचा आणखी एक 'शुध्दि' सिनेमाविषयी सांगितलं जातं होतं, की फ्लॉप सिनेमांमुळे करण जोहरने तिच्या ऐवजी दीपिका पदुकोणला घेतलं आहे. यावर करीनाने सांगितलं, 'आता मी काय सांगणार, माध्यमांची ही एक शैली आहे जे प्रत्येक गोष्टीला वाढवून सांगतात.' त्यांनी पती सैफ अली खानच्या सिनेमांवरसुध्या टिका टिप्पणी केली होती. तिच्या मते, प्रत्येक सिनेमातून सैफ त्याची प्रतिमा उंचावत आहे. करीना म्हणाली, 'मी बुलेट राजा बघितला आणि मला तो सिनेमा खूप आवडला, सैफने सिनेमात चांगला अभिनय केला आहे. सिनेमा चांगल प्रदर्शन करो ना करो पण सैफ एक चांगला अभिनय करतो.' तिने सांगितलं सैफमध्ये ही शक्ती जन्मत: आहे.