आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kareena, Karisma, Saif At Randhir Kapoor's Birthday Dinner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीना-करिश्मा पोहोचल्या 'पापा' रणधीर कपूर यांच्या बर्थडे पार्टीत, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेमा जगामध्ये 70च्या दशकात अनेक हीरोंनी यश मिळवले. त्यामध्ये रणधीर कपूर यांचाही समावेश केला जातो. 'रामपुर का लक्ष्मण', 'जवानी दीवानी', 'हाथ की सफाई', 'धरम करम', 'चाचा भतीजा'सारख्या सिनेमांतील त्यांच्या अभिनयाची आजही आठवण केली जाते. 15 फेब्रुवारीला रणधीर कपूर यांनी त्यांचा 67 वाढदिवस साजरा केला. वाढदिवसांच्या निमित्तावर ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत मुंबईच्या 'हक्कासन' या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्नेहभोजनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी बबिता, मुलगी करिश्मा-करीना कपूर, जावई सैफ अली खानही होता.
रणधीर कपूर जेव्हा हॉटेलच्या बाहेर निघाले तेव्हा करीना आणि करिश्मा त्यांना हात पकडून चालण्यासाठी मदत करत होत्या. त्यानंतर करीनाने वडील करणधीर कपूर यांना कारमध्ये बसवले. रणधीर कपूर दरवर्षी वाढदिवसानिमित्त आपल्या कुटुंबीयांसोबत डिनरसाठी बाहेर जातात.
वडीलांच्या बर्थडे पार्टीत सामील झालेल्या करीना आणि करिश्मा खूपच ग्लॅमर दिसत होत्या. करिश्माने ब्लॅक जीन्स आणि दिरव्या रंगाचा टॉप परिधान केला होता. सोबतच, करीनाने सिल्वर रंगाचा ड्रेस परिधान करून त्यावर एक ब्लेझर घातलेले होते. सैफ अली खान कॅज्यूअल लूकमध्ये दिसत होता, त्याने पांढरा शर्ट आणि ब्लॅक रंगाची जीन्स घातलेली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा, डिनरसाठी गेलेल्या कपूर कुटुंबीयांची छायाचित्रे...