आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना होणार बेगम सुमरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


खर्‍या जीवनात सैफ अली खानची बेगम झालेली करीना कपूर खान आता रिल लाइफमध्येदेखील बेगमची भूमिका साकारणार आहे. तिग्मांशू धुलिया यांच्या ‘बेगम सुमरू’ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सध्या करीना लंडनमध्ये आहे. तेथे सैफच्या ‘बुलेट राजा’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. हा चित्रपटदेखील तिग्मांशू धुलिया यांचा आहे. म्हणून करीनाच्या या चित्रपटाविषयी चर्चा केली जात आहे. खरं तर या चित्रपटात बेगमची भूमिका करीनानेच करावी, अशी तिग्मांशू यांची इच्छा आहे. मात्र करीनाने अद्याप आपला होकार दिला नाही. लंडनहून परतल्यावरच ती निर्णय घेणार आहे. याआधी तिग्मांशू यांनी राणी मुखर्जीला या भूमिकेसाठी घेतले होते. मात्र तारखा नसल्यामुळे चित्रपट बनू शकला नाही. त्यानंतर तिग्मांशू इतर चित्रपटात व्यग्र झाले. त्यामुळे या चित्रपटाला उशीर झाला. करीना लंडनमध्ये असल्यामुळे तिचा 21 सप्टेंबरला असलेला वाढदिवसही ती सैफसोबत तिथेच साजरा करणार आहे.

पुढे वाचा... कोण आहे बेगम सुमरू ?