आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना होणार ऋतिकची 'पार्वती'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अग्निपथ’ची टीम ऋतिक रोशन आणि दिग्दर्शक करण मल्होत्रा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ते ‘शुद्धी’ नावाचा सिनेमा बनवत आहेत. या सिनेमात करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नऊ वर्षांनी ऋतिक आणि करीनाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहेत. ऋतिकला याआधीही करीना कपूरसोबत काम करण्याची ऑफर आली होती. मात्र त्याने नकार दिला होता. कारण त्याची पत्नी सुझानला करीनासोबत पडद्यावर रोमान्स करणे पसंत नव्हते. त्यावेळी करीना सिंगल होती. आता करीनाचे लग्न झाले आहे. म्हणून सुझानला कदाचित भीती वाटत नसावी. आता दोघेही आपापला भूतकाळ विसरले आहेत आणि नव्याने काम सुरू करणार आहेत.

या सिनेमात ऋतिक शिवशंकराच्या भूमिकेत झळकणार आहे. तर करीना सिनेमात पार्वतीच्या भूमिका साकारणार आहे.

खरं तर या भूमिकेसाठी कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोनसुद्धा शर्यतीत होत्या. मात्र करीना कपूरच दिग्दर्शकाची पहिली आवड असल्याने तिला घेण्यात आले.

शुद्धी' सिनेमाची कथा दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि त्याची पत्नी एकता यांनी लिहिली आहे. ‘इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या गाजलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित असणार आहे.

चला तर ऋतिक आणि करीना शिवशंकर आणि पार्वतीच्या भूमिकेला योग्य न्याय देतील अशी आशा व्यक्त करुया.