आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीनाला हवे पतीकडून \'व्हॅलेंटाइन गिफ्ट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना म्हणाली की, या वर्षी मला सैफकडूनच व्हॅलेंटाइन गिफ्ट हवे. कारण मी त्याला गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये मोठे गिफ्ट दिले होते. त्याची बेगम होऊन मी त्याला आयुष्याचे सर्वात चांगले गिफ्ट दिले आहे. म्हणून आता तोच मला या वर्षी गिफ्ट देईल. लग्नानंतर सैफसोबत करीनाचा हा पहिला व्हॅलेंटाइन आहे. त्यामुळे पतौडी कुटुंबाच्या सुनेला आशा आहे की एक नवाब म्हणून सैफ मला काहीतरी चांगले गिफ्ट देईल.

खरं तर सैफसोबत वेळ घालवण्यासाठी 14 तारखेला करीनाकडे वेळ नाही. कारण ती 'सत्याग्रह' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ती म्हणाली की, या दिवशी मी सैफसोबत राहू शकणार नाही. कारण माझे शूटिंग आहे. व्हॅलेंटाइनच्या दिवशी माझ्याकडे वेळच नाही. त्या दिवशी भोपाळमध्ये शूटिंग आहे. या वर्षी माझा व्हॅलेंटाइन अमितजी (अमिताभ बच्चन), अजय देवगण आणि प्रकाश झा यांच्यासोबत होणार आहे.

प्रकाश झांच्या चित्रपटात अमिताभ, अजय देवगण, करिना कपूरसह अर्जुन रामपाल आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. करिना या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत आहे.