आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुंबई समुराई\'मधून होऊ शकतो करीनाचा पत्ता कट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री करीना कपूर खानचे नशिब सध्या तिचे साथ देत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. 'सत्याग्रह' आणि 'गोरी तेरे प्यार मे'सारख्या सिनेमांचे मोठे अपयश तिला झेलावे लागले. सध्या तिच्याजवळ केवळ 'सिंघम 2' हा सिनेमा आहे. कारण 'शुध्दी'सुध्दा तिच्या हातातून गेला आहे. तसेच फरहान अख्तरचा 'मुंबई समुराई' पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार करीनाला लवकरच या सिनेमापासून वेगळे केले जाणार आहे. ती सध्या फक्त जाहिरातीची शुटिंग करत आहे. अलीकडेच करीनाने तिची डायटिशिअन रुजुता दिवेकरचे आणखी एक पुस्तक प्रकाशित केले आहे. करीनामध्ये यावेळी पहिल्यांदा आत्मविश्वास कमी दिसून आला.
सिनेमाचे अपयश करीनाने पहिलेच स्वीकार केले आहे. नंबर एक स्थानावर टिकून राहण्यावर ती म्हणाली, 'प्रत्येक वेळ एकसारखी नसते. अनेकदा काहीच क्लिक न होणारे क्षणसुध्दा आपल्या आयुष्यात येतात. परंतु या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पार कराव्या लागतात. तेही कधी ना कधी निघून जातात. मला वाटते, लवकरच काही तरी चांगले घडेल.' बिंधास्त बेबोचे चाहते तिला असे उदास बघून दुखी होतील परंतु करीनाच्या म्हणण्यानुसार वेळ नेहमी बदलत असतो.