आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना पाकिस्तानी मोबाइल कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद-बॉलीवूड सुपरस्टार करीनाकपूरने पाकिस्तानातील सर्वात महागड्या मोबाइल कंपनीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदासाठी करार केला आहे. 33 वर्षीय ‘हिरोइन’ स्टारचा हा निर्णय चकित करणारा आहे.

‘क्यू मोबाइल’ असे कंपनीचे नाव आहे. पाकिस्तानातील सर्वाधिक विक्री होणारा मोबाइल अशी या कंपनीची ओळख आहे. लवकरच करीनाक्यू मोबाइलच्या जाहिरातीचे चित्रीकरण करणार आहे. थायलंडमध्ये त्याचे चित्रीकरण होणार आहे. फारूक मेनन क्यू मोबाइल कंपनीच्या जाहिरातीचे दिग्दर्शन करणार आहे. ही जाहिरात सर्वात महागडी असेल का, या प्रश्नावर क्यू मोबाइलचे प्रमुख विपणन अधिकारी झिशान कुरेशी म्हणाले, ही जाहिरात संपूर्ण उद्योगासाठी नाही, परंतु मोबाइल क्षेत्रासाठी मात्र सर्वात महागडी असेल, एवढे निश्चितपणे सांगता येऊ शकेल. करिनाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे मोबाइलचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपद करिनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जुहीचीदेखील चलती!

पाकिस्तानातील उत्पादनाची जाहिरात करण्याची एखाद्या बॉलीवूड स्टारची ही पहिलीच वेळ नाही. कारण एका कुकिंग तेलाच्या जाहिरातीसाठी जुही चावलाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदासाठी निवड करण्यात आली आहे. ‘आशिकी-2’ फेम आदित्य रॉय कपूर यापूर्वी क्यू मोबाइलचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर राहिला आहे. त्या जाहिरातीचे पाकिस्तानात खूप कौतुक झाले होते.
कोणाची मालकी?

क्यू मोबाइल ही कराची येथील कंपनी असून परवेझ अख्तर कंपनीचे मालक आहेत. अलाइड इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून क्यू मोबाइलचे उत्पादन केले जाते. गेल्या पाच वर्षांपासून आयात, जोडणी व वितरणाचे काम कंपनीकडून केले जाते.
नेमका कोणता मोबाइल?

नॉयर क्वॉडकोर झेड-4 असे मोबाइल सिरीजचे नाव आहे. 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा, 32 जीबी इंटर्नल मेमरी, 2 जीबी रॅम, मोशन अशी मोबाइलची वैशिष्ट्ये आहेत. त्याची किंमत पाकिस्तानी रुपयात 35 हजार एवढी आहे. क्यू मोबाइलने देशात पहिल्यांदाच अत्यंत फीचर्स असलेल्या मोबाइलला सामान्यांना परवडेल अशा दरात बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत.