आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिना कपूर म्हणते, शाकाहार हाच उत्तम आहार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोळी, भाजी, वरण, भात आणि शुद्ध तूप असे रोजच्या आहारातील पदार्थ असतात. तसेच ग्रीन सलाड व फळांचा रस रोज घेतल्याने मी एकदम तंदुरुस्त असल्याचे अभिनेत्री करिना कपूरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. तसेच आपण शाकाहारी असल्याचेही ती म्हणाली.


सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांच्या पौष्टिक आहारावर ‘इंडियन फूड विस्डम अँड द आर्ट ऑफ ईटिंग राइड’ या डीव्हीडीचे नुकतेच लाँच करण्यात आले. या वेळी ती बोलत होती. करिना म्हणाली, भारतीय पदार्थ सर्वच पातळ्यांवर कधीही सर्वोत्तम आहेत. मी रोजच्या जेवणात शाकाहारी पदार्थांनाच प्राधान्य देते. वजन वाढते म्हणून डाएटिंग करणे किंवा उपाशी राहणे मला जमत नाही. भरपूर जेवण करून व्यायामशाळेत ही ऊर्जा खर्च करणे मला नेहमीच आवडते.


पाच वर्षांपूर्वी ‘टशन’ या चित्रपटात झीरो साइझमुळे करिनाची खूप चर्चा झाली होती. मात्र, त्या वेळी केवळ दूध व केळीमिश्रित सलाड व एक कॉफी घेतल्याने अशी फिगर तयार झाली. लोकांनी तेव्हा माझ्या फिगरला झीरो साइझ नाव दिले. याचे सर्व श्रेय फिटनेस ट्रेनर ऋतुजाला आहे. तिच्या डीव्हीडीला प्रचंड प्रतिसाद मिळेल. तसेच यात पती सैफ अलीचादेखील समावेश असल्याचे ती म्हणाली.

जुन्या काळातील अभिनेत्री मधुबाला साधे जेवण घेत असत. त्यामुळेच त्या सौंदर्यवती ठरल्याचे करिना म्हणाली.


नवाबी जेवणात मांसाहार मुख्य घटक
नवाबी जेवणात मांसाहार हा मुख्य घटक असतो. सैफला मटण आवडते. मात्र, तो मांसाहार नियमित करत नाही. मी शाकाहारी असल्याने अशा जेवणातील डाळ किंवा पनीर खाणे पसंत करते.


84 वर्षांची आजी शाकाहारामुळेच फिट
माझ्या आजीचे वय आज सुमारे 84 वर्षे आहे. आपल्या जेवणात ती केवळ शाकाहारी पदार्थांना प्राधान्य देते. त्यामुळे आजी सुंदर तर आहेच, मात्र आजही ती तितकीच तंदुरुस्त असल्याचे करिनाने सांगितले.