आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेकबरोबरचे नाते तुटल्यानंतर संजय कपूरबरोबर करिश्मा अडकली रेशीमगाठीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आज (25 जून) आपला 38 वा वाढदिवस साजरा करणारी अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले आहेत. करिश्माने बॉलिवूडमध्ये आपल्या मेहनतीच्या बळावर यश प्राप्त केले आहे.

तसे पाहता हे सगळ्यांनाच ठाऊक आहे की, करिश्मा बच्चन घराण्याची सून होणार होती. अभिषेक बच्चनबरोबर करिश्माचा साखरपुडासुद्धा झाला होता. मात्र केवळ चार महिन्यांतच अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा तुटला.
अभिषेकबरोबर नाते तुटल्यानंतर दिल्लीचे व्यवसायी संजय कपूरची एन्ट्री करिश्माच्या आयुष्यात झाली. दोघांचे धुमधडाक्यात लग्न झाले. संजयच्या रुपात करिश्माच्या आयुष्यात आनंद आले होते. तिच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. करिश्मा आणि संजयला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र करिश्माच्या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली. कारण लग्नाच्या काही दिवसांतच या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला नसला तरीदेखील असे सांगितले जाते की, हे दोघेही वेगवेगळे राहतात. करिश्मा मुंबईत तर संजय दिल्लीत राहतात.
जेव्हा-जेव्हा या दोघांचे लग्न तुटल्याची बातमी मीडियात येते, तेव्हा-तेव्हा त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात बघितला जातो. करिश्मा आणि संजयचे लग्न बॉलिवूडमधील मोठ्या लग्नांपैकी एक होते.

आज करिश्माच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी क्षण अर्थातच तिच्या लग्नाचे खास क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.