आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif And Hrithik Roshan On The Set Of \'bang Bang\'

\'बँग बँग\'मध्ये पुन्हा रोमान्स करताना दिसणार ऋतिक आणि कतरिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर रोमान्स करण्‍यासाठी सज्ज आहेत. हे दोघं सिध्‍दार्थ आनंद यांच्या आगामी 'बँग बँग' मध्‍ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी मे 2014 मध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

असे म्हटले जाते आहे, की 'बँग बँग' हा सिनेमा हॉलिवूडमधील 'नाइट अँड डे 'चा हिंदी रिमेक आहे. मूळ सिनेमात टॉम क्रूज आणि कॅमरन डियाज यांची मुख्‍य भूमिका होती. ऋतिक आणि कतरिना यांनी यापूर्वी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमातून अप्रतिम प्रेमी जोडप्याची व्यक्तिरेखा रेखाटली होती. या सिनेमातील त्यांची केमिस्ट्री चांगली रंगली होती. तेव्हापासून या दोघांनी चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधील ऋतिक आणि कतरिना यांची जादू म्हणा किंवा या दोघांचा अप्रति‍म अभिनय यामुळे लोक पुन्हा त्यांचा रोमान्स पाहावयास उत्सुक आहेत.

'जिंदगी ना...' मध्‍ये यां दोघांची केमेस्‍ट्री लोकांना खूप आवडली होती.या सिनेमात चित्रीत करण्‍यात आलेल्या किसींग सीन चर्चा लोकांमध्‍ये चालू होती. 'बँग बँग' मध्‍ये याच लोकप्रियतेचा वापर निर्मात्यांनी केला आहे.

पुढील छायाचित्रांवर क्लिक करून पाहा 'बँग बँग' या सिनेमाच्या सेटवरील कतरिना आणि ऋतिक यांची मस्ती...