आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खूप झाली रणबीरबरोबर मजामस्ती, आता कामावर परतलीय कतरिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेन, दुबई आणि श्रीलंका येथे रणबीर कपूरबरोबर सुटी एन्जॉय करणा-या कतरिनाची छायाचित्रे लीक झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. ही छायाचित्रे लीक झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून कतरिना कैफचे नाव वादात अडकले आहे.

ही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मीडियामध्ये प्रकाशित झाली होती. ही छायाचित्रे प्रकाशित झाल्यानंतर कतरिनाने मीडियाला पत्र लिहून विनंती केली होती, की ही छायाचित्रे पुन्हा प्रकाशित करु नका. यासाठी कतरिनाने तिचे मीडियाबरोबर असलेल्या चांगल्या संबंधांचा उल्लेख केला होता.

असो, आता बरीच मजा-मस्ती केल्यानंतर कतरिना आपल्या कामावर परतली आहे. अलीकडेच कतरिनाने 'यार्डले' या ब्रॅण्डसाठी एक कमर्शिअल व्हिडिओ शूट केला. या जाहिरातीच्या शूटिंगसाठी कतरिना पोलंडला गेली होती.

या जाहिरातीच्या शूटिंगसाठी कतरिनाने पर्पल कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये कतरिना नेहमीप्रमाणेच सुंदर दिसली. पोलंडमधील हे शूटिंग पूर्ण करुन कतरिना आता मुंबईला परतील आहे.

ढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कतरिनाची या व्हिडिओ शूटची खास छायाचित्रे..