आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif Become Sexiest Woman Of Asia Fourth Time

GOOD NEWS: कतरिनाला चौथ्यांदा मिळाला 'वर्ल्डस सेक्सिएस्ट एशियन वुमन'चा मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'युके'तील 'इस्टर्न आय' या साप्ताहिकाद्वारे घेण्यात आलेल्या मतचाचणीच्या आधारावर बॉलिवूड दिवा कतरिना कैफला यावर्षीचा 'वर्ल्डस् सेक्सिएस्ट एशियन वुमन'चा मान मिळाला आहे. खरं तर गेल्या वर्षभरापासून कतरिनाचा एकही सिनेमा झळकला नसला तरी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतीला हा किताब पटकवण्यात कुणीही रोखू शकले नाही.
कतरिनाने प्रियांका चोप्रा, टिव्ही स्टार दृष्टी धामी आणि दीपिका पदुकोणला मागे सारत 'वर्ल्डस सेक्सिएस्ट एशियन वुमन 2013' च्या 50 प्रसिध्द महिलांच्या यादीत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. या यादीत प्रियांका चोप्रा दुसऱ्या, दृष्टी तिस-या तर दीपिका चौथ्या स्थानावर आहे. कतरिनाचा 'धूम 3' हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर असतांनाच तिने चौथ्यांदा हा मान पटकावल्याची आनंदवार्ता प्रसिध्द झाली आहे.
या यादीत 'आशिकी 2' गर्ल श्रद्धा कपूर बाराव्या स्थानावर आहे. तर माधुरी दीक्षित (23), श्रीदेवीने (40), सोनम कपूर (05), परिणीती चोप्रा (14), सोफी चौधरी (21), हीना खान (31), आणि श्रेया घोषाल (43) यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.