आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बॅँग-बॅँग’च्या शुटिंगला मिळाली हृतिकच्या मध्यस्थीमुळे मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमल्यात कतरिना कैफसोबत ‘बँग-बँग’चे शुटिंग केल्यानंतर हृतिक रोशन पुढील शूटिंगसाठी दिल्लीला गेला. मात्र, येथे शुटिंग सुरू होण्यापूर्वीच हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात अडकला. शुटिंगमुळे रखडलेल्या या चित्रपटाबाबत काही लोकांनी चित्रपटाच्या क्रू मेंबरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. यामुळे चित्रपटाचे शुटिंग बंद करण्याची वेळ आली होती. शिवाय चित्रपटाची निर्मिती होणे अशक्य वाटत होते.
दरम्यान, ही गोष्ट हृतिकला माहीत झाल्यावर त्याने स्वत: या प्रकरणात लक्ष घालून प्रकरण मिटवले. त्याने दिल्लीच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली व त्यांना परिस्थितीची संपूर्ण कल्पना दिली. त्यानंतर चित्रपटाचे शुटिंग सुरू करण्यात आले. सुरुवातीला हृतिकला शुटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे काही महिने ‘बॅँग-बॅँग’ची शूटिंग रखडली होती. मात्र, या वेळी चित्रपटात हृतिकची उपस्थिती फायद्याची ठरली आहे.