आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनासोबत काम करू इच्छित नाही सलमान, सिनेमामधून केले बाहेर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक कबीर खान सध्या सैफ अली खान आणि कतरिना कैफ यांच्यासोबत अ‍ॅक्शन-थ्रिलर 'फँटम' सिनेमा पूर्ण करण्यात व्यस्त आहे. यानंतर तो सलमान खानला घेऊन एक सिनेमा बनवणार असल्याचे संगितले जात आहे. ऐकविण्यात आले आहे, की या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ असणार आहे.
हा सिनेमा 2015मध्ये बनणार आणि रिलीज होणार आहे. परंतु एका सुत्राने सांगितले, की सिनेमात सलमान असेल पण कतरिना नाही. कबीरने या सिनेमाची कहाणी या दोघांच्या जोडीला धरून लिहिली आहे. परंतु सलमान त्याच्या बॅनर 'बीइंग ह्यूमन प्रॉडक्शन'सोबत सह-निर्माता म्हणून या सिनेमाशी जोडल्या गेल्यानंतर हीरोइन बदलली आहे.
इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे, की सिनेमाची हीरोइन बदलण्याचा निर्णय सलमानच्या इशा-यावर झाला आहे. त्याला कतरिनासोबत काम करण्यात रुची नसल्याने त्याने असे केले आहे. तिच्याऐवजी त्याला दीपिका पदुकोणला सिनेमात घेण्याची इच्छा आहे.
कतरिनाला या प्रोजेक्टमधून बाहेर केल्यामुळे कबीर खूप नाराज आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा एका सुत्राने याविषयी काय सांगितले...