आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif, Ranbir Kapoor Maintain Distance At Aamir Khan\'s Party?

आमिरच्या पार्टीत वेगवेगळे पोहोचले रणबीर-कतरिना, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'धूम 3' हा सिनेमा ब्लॉकबस्टर हिट ठरला. या सिनेमाने बॉलिवूडमध्ये कमाईचा नवा रेकॉर्ड बनवला. सिनेमाला मिळालेले यश पाहून आमिर खान खूपच आनंदी आहे. सिनेमाचे हे यश साजरे करण्यासाठी आमिरने अलीकडेच एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत 'धूम 3'ची लीड हिरोईन कतरिना कैफसह आमिरने त्याच्या ब-याच मित्रांना आमंत्रित केले होते. त्याच्या गेस्ट लिस्टमध्ये रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी यांच्याही नावाचा समावेश होता.
या पार्टीत कतरिना आणि रणबीर यांच्यातील दुरावा स्पष्ट दिसून आला. आत्तापर्यंत एकत्र दिसणारे रणबीर आणि कतरिना आमिरच्या पार्टीत मात्र वेगवेगळे दिसले. हे दोघेही वेगवेगळ्या कारमधून पार्टीस्थळी पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांत लग्नाच्या विषयावरुन भांडण झाल्याची बातमी आली होती. या भांडणानंतर दोघांचेही ब्रेकअप झाल्याचेही ऐकिवात आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा आमिरच्या पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...