आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif & Ranbir Kapoor On The Verge Of Break Up

Inside scoop: रणबीर-कतरिनामध्ये पडली वादाची ठिणगी, ब्रेकअपपर्यंत येऊन पोहोचले भांडण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही महिन्यांपासून रणबीर कपूर आणि कतरिना कैफ सतत चर्चेत आहेत. अवॉर्ड फंक्शन्स असो किंवा परदेशात सुटी एकत्र घालवणे असो, हे दोघे सतत मीडियात चर्चेत येत आहेत. आतादेखील या दोघांची मीडिया आणि बॉलिवूडमध्ये चर्चा होत आहे. मात्र यावेळी चर्चेचे कारण त्यांचे लग्न नसून त्यांच्यात झालेले भांडण आहे आणि त्यांच्या भांडणाला कारणीभूत ठरली आहे ती रणबीरची चुलत बहीण करीना कपूर.
काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या 'कॉफी विथ करन' या टॉक शोमध्ये करीनाने कतरिनाचा उल्लेख 'भाभी' म्हणून केला होता. त्यावरुन रणबीर आणि करिनाच्या रिलेशनशिपवर जणू शिक्कामोर्तबच झालं होतं. अशापद्धतीनं रणबीर आणि आपल्या नात्याचा उलगडा जगासमोर झाल्यानं कतरिना चांगलीच नाराज झाली आहे. खासगी आयुष्याविषयी अशापद्धतीने उघडपणे बोलणं कतरिनाला पसंत पडलेलं नाही. याचकारणामुळे कतरिना आणि रणबीर यांच्यात भांडण झाल्याची बातमी आहे.
सांगितलं जातंय, की गेल्या आठवड्यात या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि ही गोष्ट ब्रेकअपपर्यंत येऊन पोहोचली. इंडस्ट्रीतील काही लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला असता, या दोघांत आता दुरावा निर्माण झाल्याचेही समजते. अद्याप याविषयी दोघांपैकी कुणीही मीडियाशी काहीही बोललेलं नाहीये.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बरंच काही...