आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सख्या बहिणीच्या लग्नात काही तासांपूर्वी पोहोचली कतरिना, सलमान केले नाही आमंत्रित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची हॉट आणि सेन्सेशनल अभिनेत्री कतरिना कैफची बहिण नताशा रविवारी विवाहबंधनात अडकली. हा लग्नसमारंभ लंडनला झाला. त्यासाठी कतरिनाही लंडनला पोहोचली होती. विशेष म्हणजे कतरिना आपल्या सख्या बहिणीच्या लग्नात काही तासांपूर्वी पोहोचली होती.

सध्या कतरिना ‘धूम 3’ आणि ‘बँग बँग’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगमधून वेळ काढत आपल्या लग्नात सहभागी झाल्यामुळे नताशाने कतरिनाला धन्यवाद दिले.

तसे पाहता, रणबीर कपूरला भेटायला कतरिना श्रीलंकेला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र जेव्हा शनिवारी रात्री ती लंडनला जायला निघाली. तेव्हा ही सगळी अफवा असल्याचं स्पष्ट झालं.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कतरिनाची तिच्या बहिणभावंडांबरोबरची छायाचित्रे....