आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: कतरिनाने केले स्वीकार, \'धूम 3\'मध्ये माझ्यासाठी काहीच नव्हते करण्यासारखे\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची बार्बी डॉल अर्थातच कतरिना कैफ लॉरिअलची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाली आहे. तिने 4 फेब्रुवारीला लॉरिअल पेरिसच्या हेअर अ‍ॅण्ड केअरची नवीन रेंज लाँच केली आहे. या रेंजच्या अंतर्गत कतरिनाने काही नवीन शॅम्पूच्या रेंज लाँच केल्या. या कार्यक्रमात कतरिना खूप आकर्षक आणि हॉट दिसत होती.
कतरिनापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर आणि फ्रिडा पिंटो लॉरिअलच्या ब्रँडच्या अ‍ॅम्बेसेडर होत्या. कॅट चौथी भारतीय अभिनेत्री आहे, जी या ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर बनली आहे.
कतरिना गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'धूम 3' या सिनेमाच्या यशामुळे आनंदी आहे, परंतु ती या कार्यक्रमात थोडी वेगळ्या अंदाजात दिसली. तिने तिथे या गोष्टीचा स्वीकार केला, की सिनेमात मुख्य भूमिका साकारणे महत्वाचे असते.
प्रॉडक्ट लाँच केल्यानंतर तिने माध्यमांसोबत बोलताना सांगितले, 'मी या गोष्टीशी सहमत आहे, की 'धूम 3'मध्ये माझी भूमिका इतकीही महत्वाची नव्हती. 'धूम 3'मध्ये माझ्यासाठी काहीच करण्यासारखे नव्हते. भविष्यात मी महत्वाच्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून चाहत्यांना माझ्यावर गर्व होईल.'
मागच्या वर्षी कतरिनाचा एकच सिनेमा रिलीज झाला होता. परंतु तिची प्रतिस्पर्धी दीपिका पदुकोण आणि सोनाक्षी सिन्हाचे एकामागे एक सिनेमे रिलीज झाले होते. याविषयी कॅट म्हणते, 'सर्वांचा वेगळा प्रवास असतो. आवड आणि करिअरची तुलना करू नये. काय झाले माझा एकच सिनेमा मागच्या वर्षी रिलीज झाला, मी 2012मध्ये अनेक सिनेमे केले होते. तसे काही फरक पडत नाही, की मी एक सिनेमा केला आणि तो ब्लॉकब्लस्टर ठरला.'
लॉरिअलच्या कार्यक्रमामध्ये पांढ-याशुभ्र ड्रेसमध्ये आलेली कतरिना खूप सुंदर दिसत होती. सोबतच, तिथे तिचे हाय हिल्सचे सँडल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कतरिनाची काही खास आणि ग्लॅमरस छायाचित्रे...