आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहिरातीसाठी कॅटरिना कैफला सात कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूडची बेबी डॉल कॅटरिनाने कैफने एक नवा विक्रम केला आहे. एका पेंट कंपनीच्या जाहिरातीसाठी मॅडमला तब्बल 7 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. याआधी करिना कपूरने एका जाहिरातीसाठी 5 कोटी एवढे मानधन घेतले होते. तसेच कॅटकडे सध्या इतर 12 कंपन्यांच्या जाहिरातींच्या ऑफर आहेत. त्यामुळे ती जाहिरातीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
गेल्या महिन्यात कॅटरिनाला एफएचएम या मासिकाने सलग चौथ्यांदा जगातील सर्वांत सेक्सी महिलेचा किताब बहाल केला. यामध्ये तिने हॉलीवूड स्टार अभिनेत्री अँजेलिना जोली, मेगन फॉक्स आणि ब्लेक लिव्हली यांच्यासह बॉलीवूडमधील इतर नायिकांना तिने मागे टाकले होते. सध्या कॅट ही यश चोप्रा यांची निर्मिती असलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दौ-यावर दौरे करत आहे. नुकताच मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी इतर कलाकारांपेक्षा सर्वांचे लक्ष केवळ तिच्याकडे होते.
सध्या ‘एक था टायगर’चे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. या चित्रपटाच्या प्रोमोवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यामुळे कॅटसह सलमानदेखील चांगलाच नाराज झाला आहे. तसेच सलमान यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात कॅट आणि सलमानची केमिस्ट्री कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष असेल. बॉलीवूडमध्ये या दोघांच्या प्रेमाची चर्चा आजही तेवढ्याच जिव्हाळ्याने केली जाते.
सलमान आणि कॅटरिना सध्या जरी वेगळे झाले असले तरी सलमानचे तिच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. त्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने कॅटच्या प्रेमात कोणीही सहज पडू शकते, असे सांगितले होते. तसेच तिच्यावर प्रेम करणारे करोडो फॅन्स आहेत. त्यामुळे तिच्यासोबत पडद्यावर आणि ख-या आयुष्यात प्रेम करायला निश्चित आवडेल, असे सलमानने सांगितले होते.
शाहरुखसोबतचा अनुभव चांगला - कॅटरिना सध्या यश चोप्रा यांच्या चित्रपटात काम करत आहे. यामध्ये सलमानचा कट्टर शत्रू शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव जरी ठरले नसले तरी हा चित्रपट बंपर हिट ठरेल, असा विश्वास कॅटरिनाला वाटत आहे. शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव वेगळा होता. तो खूप अभ्यासपूर्ण अभिनेता असल्याचे कॅटरिनाने म्हटले.