आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kaun Banega Karodpati, Session Seven Has 7 Crores Jackpot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कौन बनेगा करोडपती’च्‍या सातव्‍या पर्वात असणार 7 कोटींचा जॅकपॉट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमिताभ बच्चन यांना कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढणा-या ‘कौन बनेगा करोडपती’चे सातवे पर्व लवकरच सुरू होत असून या पर्वात जॅकपॉटची रक्कम सात कोटी रुपये करण्यात आली आहे. गुरुवारी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात या सातव्या पर्वाची घोषणा करण्यात आली.


खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना बच्चन म्हणाले, 2000 मध्ये मी जेव्हा ‘करोडपती’ला सुरुवात केली तेव्हा मला वाटले नव्हते की हा कार्यक्रम एवढा लोकप्रिय होईल. केवळ तीन महिन्यांसाठी मी या कार्यक्रमाचे कंत्राट साइन केले होते. सुरुवातीला हा कार्यक्रम स्टार वाहिनीवर होता. तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा कार्यक्रम चालला आणि आम्ही तेव्हा 200 पेक्षा अधिक भाग सलग चित्रीकरण केले. हा एक विक्रमच असावा.