आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांद्याच्या दुखण्याने पुन्हा त्रासला शाहरुख, करावी लागणार एंडोस्कोपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खान काही दिवसांपासून प्रकृती संबंधीच्या समस्यांना सामोरे जात आहे. 1 मार्चला संपलेले आयएए लीडरशिप अवॉर्ड्स दरम्यान त्यांने खुलासा केला, की त्याला लवकरच खांद्याची एंडोस्कोपी करावी लागणार आहे. फराह खानचा 'हॅप्पी न्यू इअर' या आगामी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहरुखच्या खांद्याला दुखापत झाली होती.
कसा झाला होता जखमी?
23 जानेवारीला जेव्हा 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाची शुटिंग चालू होती. तेव्हा त्याच्या अंगावर एक वजनदार दार पडले होते. त्यामुळे शाहरुखला मोठी जखम झाली. शाहरुखला यापूर्वीही खांद्याला जखम झालेली आहे आणि या घटनेने त्याच्या खांद्याची जखम आणखी वाढली आहे. शाहरुख जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला खांद्याचे हाड मोडल्याचे सांगितले होते.
काय म्हणाला शाहरुख?
1 मार्चपर्यंत सर्वांनाच अपेक्षित होते, की शाहरुख लवकरच शुटिंगवर परतणार आहे. परंतु आयएए लीडरशिप अवॉर्ड्स दरम्यान ही गोष्ट समोर आली आहे, की तो सध्या पूर्णत: बरा झालेला नाहीये. एका पत्रकाराने जेव्हा जखमेविषयी त्याला विचारले तेव्हा शाहरुख यावर म्हणाला, 'मला एंडोस्कोपी करावी लागणार आहे. कदाचित शस्त्रक्रिया करावा लागणार नाहीये. परंतु एंडोस्कोपी करावीच लागेल हे नक्की.'