आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किंग खानची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ निघाली सुसाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित शाहरुख खान व दीपिका पदुकोण अभिनीत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटाने आजवरचे सर्व विक्रम मोडत पहिल्या दिवशी देशात 33.12 कोटींचा व्यवसाय करत दबंग सलमान खानच्या ‘एक था टायगर’ला मागे टाकले.


गेल्या काही वर्षांत शाहरुख खानच्या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. त्यामुळे त्याने बंपर हिट देण्यासाठी हमखास सुपरहिट देणा-या रोहित शेट्टीला चित्रपटासाठी गळ घातली. त्यानंतर शेट्टीने शाहरुखसाठी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ करण्यासाठी संमती दर्शवली. त्यानंतर चित्रीकरणापासून या चित्रपटाची हवा करण्यात आली होती. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख, दीपिका आणि रोहितने जागोजागी चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन केले. शुक्रवारी ईदच्या मुहूर्तावर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ देशातील सुमारे 4 हजार स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनानंतर काही वेळातच समीक्षकांनी चित्रपटात दम नाही, असा सूर लावत ‘चेन्नई’ धावेल, पण हळुवारपणे, असे संकेत दिले. मात्र, तरीही या वेळीही किंग खानची जादू अशी काही चालली की पहिल्या दिवशी चित्रपटाने 33 कोटींच्या वर व्यवसाय केला. विशेष म्हणजे शाहरुखचा कट्टर शत्रू असलेल्या सलमान खानच्या ‘एक था टायगर’चा या
चित्रपटाने विक्रम मोडला.


दीपिकाचा दमदार अभिनय
दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबतच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. आता ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्याने अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. चित्रपटात ती किंग खानपेक्षा अधिक भाव खाऊन गेल्याचे चित्रपट जाणकारांचे म्हणणे आहे.