आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Rao Is Trying Hard That Ranbir Katrina Will Patch Up

रणबीर-कतरिनामध्ये पॅचअप घडवून आणण्याच्या प्रयत्नात आमिरची पत्नी किरण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यात ब्रेकअप झाल्याचे तुमच्या कानावर आलेच असेल. आता बातमी आहे, की आमिर खानची पत्नी किरण राव या दोघांमधील दुरावा दुर करण्याच्या प्रयत्नात आहे. याच कारणामुळे गुरुवारी रात्री आमिर खानच्या 'फ्रीडा वन' या घरी एक खास मिटींग झाली. यावेळी रणबीर आणि कतरिना येथे पोहोचले होते. याशिवाय त्यांच्यासह अयान मुखर्जी आणि करण जोहरदेखील येथे आले होते.
खरं तर आमिर खान सध्या युरोपमध्ये असल्याचे समजते. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत किरणने ही मिटींग का ठेवली असावी? असा प्रश्न उपस्थित केला गेला होता.
मात्र सुत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार, आमिरच्या गैरहजेरीत किरणने रणबीर-कतरिनाचे जवळचे मित्र करण आणि अयान यांना बोलावून घेतले आणि तिघांनी मिळून या दोघांची बरीच समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आता किरणच्या या प्रयत्नांना यश येणार का? रणबीर आणि कतरिना यांच्यात पुन्हा पॅचअप होणार का? हे तर येणा-या दिवसांतच स्पष्ट होईल.