आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकांतात झाडांबरोबर गप्पा मारायचे किशोर कुमार, जाणून आणखी काही रंजक गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

4 ऑगस्टला मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील गांगुली कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला होता. त्याचे नाव होते आभास कुमार गांगुली. मात्र प्रेमाने त्याला गंगोपाध्याय म्हणून हाक मारली जात होती.

मात्र हा मुलगा जेव्हा मोठा झाला, तेव्हा त्याचे नाव आभास कुमारहून किशोर कुमार असे झाले.

आम्ही बोलतोय ते भारतीय सिनेसृष्टीत सदाबहार अभिनेते किशोर कुमार यांच्याबद्दल. आपल्या गायन आणि अभिनय कौशल्याच्या बळावर किशोर कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पार्श्वगायक आणि अभिनेत्याबरोबरच किशोर कुमार दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिप्ट रायटरसुद्धा होते.

4 ऑगस्ट रोजी किशोर दांचा वाढदिवस आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल, की किशोर कुमार पहिले पैसे घेत आणि नंतरच काम करत. जर त्यांना पैसे मिळाले नाही तर ते काम अर्धवट सोडून देत होते.

याशिवाय त्यांनी आपल्या घराबाहेर एक पाटी लावली होती. त्यावर लिहिले होते 'किशोर से सावधान'.

किशोर कुमार यांना फक्त फिल्म इंडस्ट्रीनेच नव्हे तर प्रत्येक कलाप्रेमीने सन्मान दिला आहे. आजचे कलाकार त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्नसुद्धा करतात.

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला किशोर कुमार यांच्या आयुष्यातील काही अशा गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या किशोर दांच्या आयुष्यातील तुम्हाला ठाऊक नसलेल्या या खास गोष्टी...