आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kiss Day Spl: Stars Could Not Control Himself, Was On The Silver Screen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Kiss Day Spl: पडद्यावर रंगला स्टार्सचा रोमान्स, ऑनस्क्रिन दिले \'किसींग सीन\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेंटाइन डे अवघ्या एक दिवसावर आला आहे. 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु त्यापूर्वी 'किस डे'सुध्दा येतो याची आठवण आज आम्ही तुम्हाला एक वेगळ्या अंदाजात करून देणार आहोत. जेव्हा किस शब्द कानावर पडतो तेव्हा आपल्याला फिल्मी स्टार्सची आठवण होते. ज्यामध्ये बॉलिवूडचे सुपरस्टार्सचे रोमँटिक किसींग सीन्स आपल्या नजरेसमोर उभे राहतात. तसे पाहता, बॉलिवूड सिनेमांमध्ये किसींग सीन आता काही आश्चर्याची गोष्ट राहिली नाहीये. सिनेमा निर्मात्यांनाही कळून चुकले आहे, की सिनेमा चालवण्यासाठी एक फंडा असतो, तो म्हणजे- 'सेक्स सेल्स'.
बॉलिवूडमधील अलीकडच्या किसींग सीन्सविषयी सांगायचे झाले तर, 'राम-लीला' सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यामध्ये चित्रीत करण्यात आलेले किसींग सीन्स खूपच आकर्षक आणि हॉट होते, ज्यांची बरीच चर्चा झाली होती.
दोघांचे आयुष्य पडद्यावरील आयुष्यापेक्षा पडद्यामागील आयुष्य खूपच रोमँटिक असल्याचे जाणवते. कदाचित हेच कारण आहे, की त्यांचे प्रेम रुपेरी पडद्यावरसुध्दा जास्तच खुलते. चाहत्यांनादेखील दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्याची इच्छा असते.
असे नाही, की असे बिंधास्त सीन्स फक्त दीपिका आणि रणवीरच देऊ शकतात. बॉलिवूडमधील असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी यापूर्वी ऑनस्क्रिन अनेकदा किसींग सीन्स दिले आहेत.
'किस डे'च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सिनेमांतील असे काही सीन्स दाखवणार आहोत, जे खरचं खूप रोमँटिक आणि हॉट आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा किसींग सीनचे किस्से...