आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About John Abraham\'s Wife Priya Runchal, Who Is She

कोण आहे प्रिया रुंचाल? जाणून घ्या जॉन अब्राहमच्या पत्नीविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने प्रिया रुंचाल नावाच्या तरुणीशी लग्न केल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. स्वतः जॉनने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला. याशिवाय जॉनच्या वडिलांनीही दोघांचे कोर्ट मॅरेज झाल्याचे स्पष्ट केले. प्रियाच्या एन्ट्रीपूर्वी जॉनच्या आयुष्यात बिपाशा बसु होती. तब्बल नऊ वर्षे जॉन आणि बिपाशा रिलेशनशिपमध्ये होते. 'जिस्म' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. मात्र नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
बिपाशासह ब्रेकअप झाल्यानंतर जॉन प्रियासह सार्वजनिक ठिकाणी दिसू लागला. जॉन अब्राहम, बिपाशा बसू आणि प्रिया रुंचाल एकाच जीममध्ये वर्कआऊट करायचे. येथेच 2010 साली जॉन आणि प्रियाची पहिली भेट घडली होती. त्यानंतर हळूहळू हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अद्याप जॉन किंवा प्रियाने मीडियासमोर येऊन लग्नाची गोष्ट कबूल केलेली नाही. मात्र सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून दोघांच्या लग्नाची बातमी उघड झाली आहे. जॉनची जोडीदार बनलेली प्रिया रुंचाल कोण आहे? याविषयी ब-याच जणांना ठाऊक नाहीये.
प्रिया रुंचालविषयी जाणून घेण्यास पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...