आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Koffee With Karan: Kareena Confirms Ranbir Kapoor Relationship With Katrina

KOFFEE WITH KARAN: बेबोने कॅटला म्हटले \'भाभी\', समलैंगिक संबंध ठेवण्यास उत्सुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - एक काळ असा होता, की कतरिना कैफ आणि करीना कपूर यांच्यातील कॅट फाईट चर्चेचा विषय होती. मात्र आता करीना कपूरमध्ये बराच बदल झालेला दिसून येतोय. कारण 'कॉफी विथ करण' या शोमध्ये करीनाने कतरिनाचा केवळ 'भाभी' म्हणूनच उल्लेख केला नाही, तर भाऊ रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नात लहेंगा चोली परिधान करुन डान्स करणार असल्याचेही सांगितले.

करीना इथवरच थांबली नाही, तर करणने जेव्हा तिला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीबरोबर समलैंगिक संबंध ठेवायला आवडतील, असा प्रश्न विचारला, तेव्हा करीनाने असे नाते 'भाभी' कतरिनाबरोबर ठेवायला आवडेल, असे सांगितले.

विशेष म्हणजे जेव्हा करणने करीनाला असे प्रश्न विचारले तेव्हा रणबीर कपूर तिथे हजर होता. करीना आणि रणबीर स्पेशल 'कॉफी विथ करण'चा एपिसोड अद्याप प्रसारित झालेला नाही. मात्र त्यापूर्वीच करीनाने केलेले खुलासे समोर आले आहेत.

'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात अभिनेता सलमान खान त्याचे वडील सलीम खान यांच्याबरोबर शोमध्ये सहभागी झाला होता. 47 वर्षीय सलमानने शोमध्ये खुलासा केला होता, की तो अद्याप व्हर्जिन असून आपल्या गर्लफ्रेंड्ससोबत खोटे बोलायचा.

पुढे वाचा, लग्नाच्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया होती रणबीरची...