आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रांतीला तिकीट टू हॉलिवूड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हॉलिवूड पटांमध्ये आपली छाप सोडली. हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीदेखील यात मागे राहिलेली नाहीये. मराठी चित्रपटसृष्टीनेही सातासमुद्रापलीकडे झेप घेतली आहे. अनिल कपूर, नसिरुद्दीन शाह, गुलगन ग्रोव्हर या हिंदी कलाकारांबरोबरच राजेश श्रृंगारपुरे, चिन्मय मांडलेकर, गणेश यादव या मराठी कलाकारांनाही हॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. आता या पंगतीत एक मराठी अभिनेत्री सहभागी झाली आहे. या अभिनेत्रीलाही हॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. ही अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवल्यानंतर आता क्रांतीने सातासमुद्रापलीकडे झेप घेतली आहे.
मदर तेरेसा यांच्या आयुष्यावर तयार झालेल्या एका हॉलिवूडपटात क्रांती एका ननच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचे शुटिंग गोव्यात पूर्ण झाले आहे. 'दे लेटर्स' हे या हॉलिवूड सिनेमाचे नाव आहे. विल्यम रिएड यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात ओलिविया हसी मदर तेरेसाची यांच्या भूमिकेत आहे. तर क्रांतीने दीपा अमरीश नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. ही दीपा नंतर सिस्टर गर्टरूड होते.

क्रांतीचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेत झाल्यामुळे नन्सना खूप जवळून पाहिले असल्याचे क्रांती सांगते. विशेष म्हणजे या चित्रपटात एका १५ वर्षांच्या मुलीपासून ते ३५ वर्षांची स्त्री अशा रुपात क्रांती दिसणार आहे. या भूमिकेसाठी क्रांतीला वजन घटवून पुन्हा १० दिवसांत ते वाढवावे लागले आहे. ओलिविया हसी यांच्याव्यतिरिक्त या सिनेमात ज्युलियेट स्टीव्हन्सन, प्रवीशी दास आणि तिलोत्तमा शोमे असे दोन भारतीय कलाकार आहेत. या हॉलिवूडपटाचा भाग झाल्यामुळे क्रांती सध्या सातवे आसमान पर आहे.
'बिग ब्रदर'मध्‍ये पुन्‍हा भारतीय वंशाच्‍या डियानावर वर्णभेदी टीका