आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TRAILER: सिल्व्हर स्क्रिनवर जादू दाखवण्यासाठी आला KRRISH, बघा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन आणि सर्जरीनंतर पुन्हा एकदा कामात बिझी झालेल्या ऋतिक रोशनच्या 'क्रिश 3' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर या ट्रेलरला पसंतीची पावती मिळत आहे.
हा सिनेमा यावर्षी दिवाळीच्या दुस-या दिवशी रिलीज करण्याऐवजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रिलीज करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
मल्टिप्लेक्स मालकांच्या मते, हा सिनेमा चांगला बनला आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला तरीदेखील याला चांगले ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे.
अद्याप राकेश रोशन यांनी सिनेमाच्या रिलीज डेट स्पष्ट केलेली नाहीये.
आता टीव्ही आणि यूट्यूबवर या सिनेमाचा ट्रेलर बघता येणार आहे. शिवाय येत्या शुक्रवारी 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाबरोबर 'क्रिश 3'चा ट्रेलर थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
बघा या सिनेमाच्या ट्रेलरची खास झलक...