आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Krrish 3 Official Theatrical Trailer Watch Villain And Super Hero

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'क्रिश 3'मध्ये विवेकने घातला 28 किलोंचा कॉश्च्युम, ऋतिकने कष्टाने मिळवले पिळदार शरीर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - 'क्रिश 3'चा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सोशल नेटवर्किंग साईट्सवर सोळा लाख लोकांनी 'क्रिश 3'चा ट्रेलर बघितला.

या सिनेमाविषयीच्या काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय. या सिनेमात विवेक ओबरॉयने व्हिलनची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमात विवेकने 28 किलोंचा कॉश्च्युम घातला आहे.

तर दुसरीकडे बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशन जेव्हाही मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा काही तरी नवीन घेऊन येत असतो. 'क्रिश' या सिनेमासाठी ऋतिकने जबरदस्त बॉडी बनवली होती. मात्र त्यानंतर 'धूम 2'साठी त्याला दहा किलो वजन कमी करावे लागले होते. यावेळी पुन्हा एकदा ऋतिकची बॉडी बघून प्रेक्षक आश्चर्यचकित होणार आहेत. असे म्हटले जात आहे, की ऋतिकने यावेळी पुन्हा एकदा मोठ्या कष्टाने बॉडी बनवली आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या सिनेमात त्याची एवढी शानदार बॉडी दिसलेली नाहीये. मात्र गुडघे आणि पाठीचे दुखणे, त्यानंतर झालेल्या मेंदुच्या ऑपरेशननंतर ऋतिकने एवढे पिळदार शरीर कसे बनवले, हा मोठा प्रश्न आहे. ऋतिकने विशिष्ट पद्धतीने आणि बारा आठवड्यांचे नियोजन करुन पिळदार शरीर मिळवले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या ऋतिकच्या पिळदार शरीर बनवण्यामागचे सिक्रेट्स...

पुढे वाचा, दुखापतीनंतर बेडवर दररोज तीन पॅकेट सिगारेट ओढायचा ऋतिक...