आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kunal Kapoor Engaged To Amitabh Bachchan\'s Niece

अभिनेता कुणाल कपूरचा अमिताभ बच्चन यांच्या पुतणीसोबत झाला साखरपुडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये सध्या सर्व स्टार्सना लग्नाची फारच घाई झालेली दिसून येत आहे. अलीकडेच, हेमा आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहानाच्या लग्नाची सर्व ब़ॉलिवूडमध्ये धूम दिसून आली. आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशीच आणखी एक बातमी सांगणार आहोत.
'रंग दे बसंती'सारख्या सुपरहिट सिनेमात अभिनय केलेला बॉलिवूड स्टार कुणाल कपूरचा अलीकडेच अजिताभ बच्चन यांच्या मुलीसोबत साखपुडा झाला. अजिताभ आणि रमोला बच्चन यांची मुलगी नैना बच्चन अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे. कुणाल आणि नैनाचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते आणि अलीकडेच एका खासगी सेरेमनीमध्ये त्यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली आहे.
अमिताभ यांची पुतणी नैना इनव्हेस्टमेंट बँकर आहे. भावी नवरा कुणालसोबत जास्तीत-जास्त वेळ घालवता यावा म्हणून ती काही दिवसांपूर्वीच दिल्लीला स्थायिक झाली आहे. कुणाल आणि नैनाची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने झाली होती. काही भेटीतच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कुणालच्या सांगण्यानुसार, 'नैना आणि मी एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत. आमचे नाते पुढेही असेच टिकून राहिल.'
कुणाल लंडनमध्ये अनुराग कश्यपच्या 'लव शव ते चिकन खुराना' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. तेव्हा नैना लंडनमध्ये कुणाल राहत असलेल्या हॉटेलमध्ये अनेकदा दिसली होती. सिनेमाच्या संबंधीत एका सुत्राच्या सांगण्यानुसार, ते दोघेही लंडनच्या काही प्रसिध्द ठिकाणी फिरतानासुध्दा दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा नैनाची काही खास छायाचित्रे...