आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lakme Fashion Week: Dia Mirza,Sakshi Tanwar, Ayushmann Khurrana, Malaika Arora, Sushant Singh Rajput Walk The Ramp For Vikram Phadnis

LFW 2013: रॅम्पवर अवतरले बी टाऊनचे लखलखते तारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅक्मे फॅशन वीकचा चौथा दिवस बॉलिवूडच्या नावी राहिला. एक नव्हे दोन नव्हे तर बी टाऊनचे तब्बल 30 सेलिब्रिटी लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी रॅम्पवर अवतरले. फॅशन डिझायनर विक्रम फडणीसच्या शोसाठी सेलिब्रिटींनी रॅम्पवॉक केला.

'रुरल इंडिया' ही विक्रम फडणीसच्या शोची थीम होती. यावेळी आशुतोष गोवारिकर, अनुराग बसू, वैभवी मर्चंट, एकता कपूर, साक्षी तन्वर, कुणाल कपूर, नेहा धुपिया, पूनम सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरबाज खान, मलायका अरोरा खान, फराह खान, रोहित बल, दिया मिर्झा, जितेंद्र, सुशांत सिंग राजपूत, जुही चावला यांच्यासह अनेक सेलेब्सचा जलवा रॅम्पवर बघायला मिळाला.

'स्वदेश फाऊंडेशन'बरोबर मिळून विक्रमने हा शो केला होता. स्वदेश फाऊंडेशन ही संस्था ग्रामीण भागासाठी काम करते.

छायाचित्रांमध्ये पाहा या ग्लॅमरस फॅशन शोची खास झलक...