आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FASHION.... है ये जलवा, फॅशन का है ये जलवा...!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅशन जगतात डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, मॉडेल्स आणि सेलिब्रिटी ज्याची सर्वात आतुरतेने वाट बघतात तो महत्त्वाचा क्षण असतो फॅशन शो. मुंबईत नुकतीच लॅक्मे फॅशन वीकला सुरुवात झाली आहे. पाच दिवस चालणा-या या फॅशन वीकमध्ये मॉडेल्स आणि सेलिब्रिटी नावाजलेल्या फॅशन डिझायनर्सचे कलेक्शन सादर करतात. 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत चालणा-या या फॅशन शोमध्ये बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार रॅम्पवर अवतरले.

मनीष मल्होत्रा, रॉकी स्टार, हृषिता चॅटर्जी देशपांडे, अर्पिता मेहता, पायल सिंघल, अनिता डोंग्रे यांसह अनेक डिझायनर्सनी आपले कलेक्शन सादर केले. इंडियन आणि वेस्टर्नचा संगम या फॅशन शोमध्ये बघायला मिळाला.

सोनाली बेंद्रे, ईशा कोपीकर, सोहा अली खान, रणदीप हुड्डा, करिश्मा कपूर, जॅकलीन फर्नांडिस, काजोल, शबाना आझमी या सेलिब्रिटींनी रॅम्पवर आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले.

आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून लॅक्मे फॅशन वीकमधील फॅशनचा जलवा दाखवत आहोत.

चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा हा फॅशनचा जलवा...