आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lakme India Fashion Week:Celebs At Manish Malhotra\'s Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसला उर्मिला, काजोल, जॅकलिनचा ग्लॅमरस अंदाज, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत लॅक्मे फॅशन वीकला सुरुवात झाली आहे. मनीष मल्होत्राच्या रिफ्लेक्शन अर्थात प्रतिबिंबचे कलेक्शन सादर करण्यासाठी एक-दोन नव्हे, तर सहापेक्षा अधिक सेलिब्रिटी रॅम्पवर अवतरल्या.

यामध्ये मनीषची खास मैत्रिण काजोल आपल्या बहिणीबरोबर रॅम्पवर अवतरली. ब्लॅक लहेंग्यावर तिने नेट डिझायनर कुर्ता घातला होता. तनीषा क्रिम कलरच्या साडीत रॅम्पवर आली.

याशिवाय माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये रॅम्पवर एन्ट्री घेतली. करीना कपूरसुद्धा मनीषसाठी रॅम्पवॉक करेल, असे म्हटले जात होते. मात्र सध्या करीना सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे या फॅशन शोमध्ये सहभागी होऊ शकली नाही. मात्र तिची मोठी बहिण करिश्मा कपूरने येथे आवर्जुन हजेरी लावली. व्हाईट कलरच्या अनारकलीमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसली.

तर श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस यावेळी ब्राइट पिंक फ्लोरलेंथ अनारकलीमध्ये रॅम्पवर अवतरली. या सेलिब्रिटींमध्ये उर्मिला मातोंडकरही दिसली. तिने ब्राइट यलो आणि गोल्डन कलरचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता. याचबरोबर शबाना आझमीसुद्धा यावेळी रॅम्पवर दिसल्या.

पुढील स्लाईड्समध्ये बघा मनीषाच्या शोमध्ये पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...